(पिंपरी, प्रतिनिधी दि. 7 नोव्हेंबर ): शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग क्रमांक ३१ मधील पारस हॉस्पिटलसमोरील परिसर, विनायक नगर, आदर्श नगर आणि इंद्रप्रस्थ सोसायटीसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक माऊलीशेठ जगताप यांच्या सूचनेनुसार संबंधित भागाची तातडीने पाहणी करण्यात (Mla Shankar Jagtap)आली.
पावसाच्या पाण्याचा प्रभावी निचरा कसा करता येईल, याचे नियोजन करून संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्यात आला. तसेच पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी बाहेर काढण्यास मदत करण्यात आली. वाहनांचे नुकसान टाळण्यासाठी पाण्यात अडकलेल्या गाड्याही बाहेर काढण्यात (Mla Shankar Jagtap) आल्या.
यावेळी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यकपणे पाण्यातून प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले. या मदतकार्यात संजय मराठे मित्र परिवारानेही सक्रिय सहभाग(Mla Shankar Jagtap) घेतला.

स्थानिक नागरिकांनी वेळेवर करण्यात आलेल्या मदतकार्याबद्दल समाधान व्यक्त करत संबंधित पदाधिकाऱ्यांचे आभार (Mla Shankar Jagtap)मानले.
