(पिंपरी | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहरात यापुढे केवळ कचरा साठवण्यासाठी पारंपरिक ‘कचरा डेपो’ उभारले जाणार नाहीत. त्याऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, पर्यावरणपूरक आणि पूर्णपणे दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज महापालिका सभेत केली. या निर्णयामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शाश्वत होण्यास मदत होणार (Waste Management)आहे.
आज झालेल्या महापालिका सभेत मोशी येथील कचरा डेपोचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मोशी येथे एकाच ठिकाणी कचऱ्याचे संकलन आणि प्रक्रिया होत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असून, त्याचा ताण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी (Waste Management)केली.
यावर उत्तर देताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, महापालिका आता केंद्रीकृत कचरा व्यवस्थापन पद्धतीऐवजी विकेंद्रीकृत प्रणाली राबविणार आहे. त्याअंतर्गत शहरातील विविध भागांत अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येतील. या केंद्रांमध्ये कचऱ्यावर जागेवरच वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे कचऱ्याचे मोठे ढीग साचणार नाहीत आणि मोशी डेपोवरील ताणही लक्षणीयरीत्या कमी (Waste Management)होईल.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, “शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येणारी कचरा प्रक्रिया केंद्रे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि पूर्णपणे दुर्गंधीमुक्त असतील. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन, पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर करण्यावर महापालिका भर देणार (Waste Management)आहे.”
महापालिकेच्या या नव्या धोरणामुळे भविष्यात शहरात कचऱ्याचे डोंगर निर्माण होण्यास आळा बसण्यास मदत होणार असून, पर्यावरणपूरक आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने पिंपरी-चिंचवड महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे मानले जात (Waste Management)आहे.
