(पिंपरी-चिंचवड,6सप्टेंबर 2026): शहरातील मानाची आणि पारंपरिक दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहीहंडी उत्सव समितीच्या दहीहंडीचा थरार उत्साहात पार पडला. यंदाची दहीहंडी फोडण्याचा मान मुंबई, चेंबूर येथील ‘शितलादेवी’ गोविंदा पथकाने मिळवला. विजेत्या पथकाला ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात (Chinchwadgaon Dahi Handi)आले.
दहीहंडी महोत्सवाची सुरुवात चिंचवडगावातील श्री छत्रपती शिवाजी उदय मंडळाच्या ‘शिवोदय’ पारंपरिक ढोल-ताशा पथकाच्या वादनाने झाली. मुंबई येथील ‘हरे कृष्णा हरे रामा’, चेंबूर येथील ‘शितलादेवी’ आणि गोवंडी येथील ‘लुंबिनीबाग’ गोविंदा पथकांनी चित्तथरारक मानवी मनोरे आणि कसरतींचे प्रदर्शन करीत प्रेक्षकांची मने (Chinchwadgaon Dahi Handi) जिंकली.
अखेर चेंबूरच्या ‘शितलादेवी’ गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत विजेतेपद पटकावले. दहीहंडी उत्सवाचे संयोजक अॅड. मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, पिंपरी-चिंचवड महापालिका सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, ‘ब’ प्रभाग समिती सभापती मंदार देशपांडे, नगरसेवक शेखर चिंचवडे, नगरसेविका मनीषाताई चिंचवडे आणि ज्येष्ठ भाजपा नेते पै. ज्ञानेश्वर आप्पा शेडगे यांच्या हस्ते विजेत्या पथकाला रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात (Chinchwadgaon Dahi Handi) आले.
या महोत्सवाला सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे चिंचवडमधील तरुणाईमध्ये मोठा उत्साह पाहायला (Chinchwadgaon Dahi Handi) मिळाला.
दहीहंडीच्या उत्साहासोबतच यावेळी नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेचा संदेश देण्यात आला. DCP Zone-1 यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड पोलिस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थविरोधी अभियानांतर्गत नागरिकांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत ढवान यांनी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या उपस्थितीत नागरिकांना नशामुक्ती तसेच सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करून शपथ (Chinchwadgaon Dahi Handi)दिली.
कार्यक्रमास टाटा मोटर्स युनियनचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ भाजपा नेते पै. ज्ञानेश्वर शेडगे, समितीचे मार्गदर्शक दत्ताभाऊ चिंचवडे, रवींद्र देशपांडे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर बच्चे, भाजपा राज्य परिषद सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, युवा नेते हेमंत डांगे, पिंपरी-चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे, भाजपा उपाध्यक्ष कैलास सानप, कामगार नेते हरीभाऊ चिंचवडे, चिंचवडगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, चिंचवडचा राजा संत ज्ञानेश्वर मंडळाचे विठ्ठलभाऊ सायकर, महेश मिरजकर, काळभैरवनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश लांडगे, कालभैरवनाथ उत्सव समितीचे आवेश चिंचवडे, चेतन चिंचवडे, योगेश चिंचवडे, सुनील लांडगे, राघूशेठ चिंचवडे, दहीहंडी उत्सव समितीचे नंदूकाका भोगले, मनीष पंजाबी, राजन पाटील, अख्तर पिंजरी, लतीफ मुलानी, महेश कंद, योगेश मिरजकर, विशाल भोईर, महेश गावडे आदी मान्यवर उपस्थित (Chinchwadgaon Dahi Handi) होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर बच्चे आणि नंदू भोगले यांनी (Chinchwadgaon Dahi Handi) केले.

