(देहू, दि.प्रतिनिधी ७ जुलै) : संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा अखंड गजर, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि लाखो वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात श्रीक्षेत्र देहू येथून मंगळवारी दुपारी श्री संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान (Ashadhi Wari 2026) झाले.
पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने अनावश्यक गर्दी टाळण्याचे केलेले आवाहन वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाळल्याचे दिसून (Ashadhi Wari 2026)आले.
दुपारी सुमारे ३ वाजता कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या पत्नी तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत महापूजा झाल्यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ (Ashadhi Wari 2026)झाली.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, सारिका शेळके, अजित महाराज गोसावी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार जयराज देशमुख, गणेश खांडगे, नगरसेवक योगेश काळोखे, आदित्य टिळेकर, कांतीलाल काळोखे, गणेश हगवणे, संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित (Ashadhi Wari 2026)होते.

मानाच्या अश्वांची प्रदक्षिणा, पारंपरिक धार्मिक विधी, मानकरी, वीणेकरी आणि दिंड्यांच्या सहभागामुळे संपूर्ण देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या या पालखी सोहळ्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक देहूत दाखल झाले(Ashadhi Wari 2026) होते.
पालखी प्रस्थानानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भक्तीचा महासागर पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी, ढगाळ वातावरण आणि आल्हाददायक हवामानात वारकरी जलाभिषेकाचा आनंद घेत हरिनामाच्या गजरात पुढे सरकत होते. तुतारी, टाळ, मृदंग, विणेचा झंकार, फुगड्या आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून(Ashadhi Wari 2026) गेला.
दुपारी २.३० वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवराज संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी भजनी मंडपातून प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. सायंकाळी सहाच्या सुमारास पहिल्या मुक्कामासाठी पालखी इनामदार वाड्याकडे रवाना(Ashadhi Wari 2026) झाली.
भगवी पताका खांद्यावर आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन महिला वारकरी, मुखी हरिनाम आणि “ज्ञानोबा-तुकाराम”चा अखंड जयघोष करीत लाखो भाविक पंढरीच्या वाटेने निघाले. चोपदाराचा दंड आणि शिंगाड्याचा आवाज होताच टाळ, मृदंग आणि विणेच्या निनादाने संपूर्ण देऊळवाडा परिसर भक्तिमय(Ashadhi Wari 2026) झाला.
पालखी प्रस्थानाच्या दिवशी श्रीक्षेत्र देहूतील मुख्य मंदिर आणि वैकुंठगमन मंदिर परिसर पहाटेपासूनच भाविकांनी फुलून गेला होता. इंद्रायणी नदीला महापूर आलेला असतानाही नदीची पाणीपातळी सुमारे सात ते आठ फूट घटल्याचे दिसून आले. महापुरातून वाहून आलेल्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन भाविकांना नदीत स्नान करण्यास पोलिस प्रशासनाने मज्जाव केला होता. त्यामुळे भाविकांनी मुक्कामस्थळीच स्नान करून दर्शनासाठी यावे, असे आवाहन प्रशासनाने (Ashadhi Wari 2026)केले.
प्रथेनुसार पहाटे ५ वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि शिळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख आणि मानकऱ्यांच्या हस्ते महापूजा झाली. त्यानंतर सकाळी ६ वाजता पूजारी सदाशिव महाराज मोरे यांच्या हस्ते वैकुंठगमन मंदिरात महापूजा पार (Ashadhi Wari 2026)पडली.

सकाळी १० वाजता पालखी प्रस्थानानिमित्त काल्याचे कीर्तन पुंडलिक महाराज मोरे देहूकर यांनी केले. “जुझीये संगती, झाली आमुची निश्चिती…” या अभंगाचे निरूपण करत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात(Ashadhi Wari 2026) आली.
सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कृष्णा सोळंकी गंगा म्हसलेकर यांनी परंपरेनुसार श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका घोडेकर सराफ कुटुंबाकडे चकाकीसाठी नेल्या. सुनिल घोडेकर, अनिल घोडेकर आणि ऋषिकेश घोडेकर यांनी रिठे व पितांबरीच्या साहाय्याने पादुकांना चकाकी दिली. त्यानंतर अभंग आरती करून पादुका इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. तेथे विश्वस्त दिलीप महाराज मोरे गोसावी यांच्या हस्ते पादुकांची विधिवत पूजा करण्यात (Ashadhi Wari 2026)आली.
काल्याचे कीर्तन संपल्यानंतर पादुका मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. म्हतारबा दिंडीसह त्या डोक्यावर घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात मुख्य मंदिरात आणण्यात आल्या. मंदिराला प्रदक्षिणा घालून पादुका भजनी मंडपात विराजमान करण्यात (Ashadhi Wari 2026)आल्या.
याचवेळी विविध दिंड्या आपल्या पारंपरिक क्रमाने मुख्य मंदिरात प्रवेश करत होत्या. मानाच्या दिंड्या, फडकरी आणि वीणेकरी महाद्वारातून मंदिरात प्रवेश करून भजन, हरिनाम आणि पावले खेळत मंदिराला प्रदक्षिणा घालून उत्तर दरवाजातून बाहेर पडत(Ashadhi Wari 2026) होते.
दुपारी २.३० वाजता भजनी मंडपात प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला. सेवेकऱ्यांनी चांदीचे पूजेचे ताट, चौरंग, पाट आणि सिंहासन आणल्यानंतर ग्रामोपाध्याय सुभाष टंकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांच्या हस्ते धरती, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पंचमहाभूतांचे पूजन, पाद्यपूजा व कलशपूजा करण्यात (Ashadhi Wari 2026)आली.

प्रथेनुसार प्रथम श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा युवराज संभाजीराजे छत्रपती, त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झाली. दुपारी ३ वाजता पादुका पालखीत विराजमान करून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. आरतीनंतर संस्थानच्या वतीने मानकरी आणि दिंडीकऱ्यांचा नारळ व प्रसाद देऊन सन्मान करण्यात (Ashadhi Wari 2026)आला.
