(चिंचवड) : प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात ‘प्रतिभा जॉब फेअर २०२६’ या रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे एम्प्लॉयमेंट ऑफिस तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने हा मेळावा आयोजित करण्यात आला (Pratibha Job Fair 2026) आहे.
प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा हा ११ वा मेगा जॉब फेअर असून, विविध क्षेत्रातील नामांकित बहुराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील कंपन्या सहभागी होणार आहेत. यंदा ५० हून अधिक कंपन्यांचा सहभाग अपेक्षित असून, सुमारे १ हजार रोजगाराच्या संधी जागेवर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी(Pratibha Job Fair 2026) दिली.
या रोजगार मेळाव्यात फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. बी.कॉम., बीबीए, बीसीए, बी.एस्सी., एम.कॉम., एमबीए, एमसीए, एम.एस्सी., बीई, बी.टेक., एमई, एम.टेक., अभियांत्रिकी डिप्लोमा, फार्मसी आणि आयटीआय अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध (Pratibha Job Fair 2026) आहेत.
यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांना दरवर्षी १८० हून अधिक कंपन्यांचा सहभाग, सुमारे १० ते १५ हजार इच्छुक उमेदवारांची उपस्थिती आणि ५ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे आयोजकांनी नमूद केले (Pratibha Job Fair 2026) आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी प्रवेश व नोंदणी विनामूल्य आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांसाठी पूर्वनोंदणी अनिवार्य असून, अधिक माहितीसाठी ८६००१००९४२ या क्रमांकावर संपर्क साधावा. जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक सचिव तथा जॉब फेअरचे मुख्य आयोजक डॉ. दीपक शहा यांनी केले(Pratibha Job Fair 2026) आहे.


