(पिंपरी, दि. ४प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसांत झाडे व मोठ्या फांद्या कोसळण्याच्या २७ घटना घडल्या आहेत. या सर्व ठिकाणी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने कार्यवाही करून रस्ते वाहतुकीसाठी खुले (PCMC Rain) केले.
महापालिकेच्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी १२ तर ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १५ अशा एकूण २७ झाडपडीच्या घटना नोंदविण्यात (PCMC Rain)आल्या.
या घटना चिंचवडगाव, भोसरी, पिंपरी, निगडी, फुगेवाडी, काळेवाडी, प्राधिकरण, पिंपळे सौदागर, किवळे, मोशी, कासारवाडी, दापोडी आणि आकुर्डीसह शहरातील विविध भागांत घडल्या. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत झाडे व फांद्या हटविल्या. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रस्ते तातडीने मोकळे करण्यात (PCMC Rain) आले.
महापालिकेने नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या झाडांखाली उभे राहणे किंवा वाहने पार्क करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच झाड पडणे, धोकादायक फांद्या किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले (PCMC Rain) आहे.
