साठवणीतली गाणी:भाग पहिला : प्रेमवेडी राधा…
काही गाणी आपल्या आयुष्यात आपल्याही नकळत इतकी Bsnl होऊन जातात की, ती फक्त गाणी राहत नाहीत; ती आपल्या आठवणींचा, बालपणाचा आणि भावविश्वाचा अविभाज्य भाग (Nostalgic Songs) बनतात.
असेच एक गाणे म्हणजे १९७६ साली प्रदर्शित झालेल्या आराम हराम आहे या मराठी चित्रपटातील “प्रेमवेडी राधा…”
माझा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी बीड जिल्ह्यातील तत्कालीन पाटोदा तालुक्यात (आताचा शिरूर कासार तालुका) असलेल्या पाडळी या छोट्याशा गावात झाला. वडील दिगंबरराव कुलकर्णी उर्फ पंडित गुरुजी हे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक(Nostalgic Songs) होते.
आमच्या घरची परिस्थिती अगदीच सामान्य नव्हती, पण फार श्रीमंतही नव्हती. मात्र वडील अत्यंत आधुनिक आणि पुरोगामी विचारांचे होते. काळासोबत, किंबहुना काळाच्या थोडे पुढे जाऊन विचार करणारे. आम्हाला जे काही आवश्यक वाटेल ते शक्य तितके उपलब्ध करून देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न (Nostalgic Songs) असे.
माझी आई फारशी शिकलेली नव्हती. तरी तिला कामापुरते लिहिता-वाचता येत असे. अनेक श्लोक, पुराणांतील कथा, अध्याय तिला मुखोद्गत होते. आजही वयाची ८३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तिची स्मरणशक्ती पाहून आश्चर्य (Nostalgic Songs) वाटते.
तिला वाचनाची प्रचंड आवड होती. पण त्या काळात आजसारख्या सुविधा नव्हत्या. वर्तमानपत्रही सहज मिळत नसे. मासिके, नियतकालिके तर दूरची गोष्ट. वडील जिल्ह्याच्या गावी गेले की तिच्यासाठी काहीतरी वाचायला आणत(Nostalgic Songs) असत.
अशाच एका वेळी त्यांनी तब्बल ६८ की ७० रुपयांचा रेडिओ आणला. त्या काळात तो आमच्यासाठी मोठा खजिनाच(Nostalgic Songs) होता.
त्या रेडिओवर श्रुतिका, नाटके, विविध कार्यक्रम आणि अर्थातच गाणी ऐकायला मिळत. संगीताची गोडी मला तिथूनच (Nostalgic Songs) लागली.
असाच एक दिवस हे गाणे कानावर पडले…
“प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा…”
आशा भोसले यांचा स्वर्गीय स्वर, ग. दि. माडगूळकर (गदीमा) यांचे अप्रतिम शब्द आणि बाबूजी सुधीर फडके यांचे श्रवणीय संगीत… ही त्रिवेणी एकदा मनात उतरली आणि कायमची तिथेच(Nostalgic Songs) राहिली.
नंतर १९८९ साली घरी टीव्ही आला. एकदा आराम हराम आहे हा चित्रपट पाहण्याचा योग आला आणि या गाण्याच्या प्रेमात आणखी (Nostalgic Songs) पडलो.
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘विनोद खन्ना’ म्हणून ओळखले जाणारे देखणे रवींद्र महाजनी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी रुही बेर्डे यांच्यावर हे गीत चित्रित झाले(Nostalgic Songs) आहे.
या गाण्यात रवींद्र महाजनी यांच्या तोंडी एकही संवाद नाही. पण त्यांनी केवळ मुद्राभिनयातून जे भाव व्यक्त केले आहेत, ते अक्षरशः लाजवाब आहेत. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे गाण्याला एक वेगळेच सौंदर्य लाभले(Nostalgic Songs) आहे.
पुढे १९९३ साली मी पुण्यात कोथरूडला असताना त्यांची अनेकदा भेट व्हायची. प्रत्यक्ष आयुष्यातही ते तितकेच रुबाबदार आणि दिलखुलास (Nostalgic Songs) वाटले.
रुही बेर्डे यांचे चित्रपट मला कधी फारसे पहायला मिळाले नाहीत , हे खरे. पण या गाण्यात त्यांनीही अप्रतिम अभिनय केला आहे. कोपरापर्यंत लांब बाह्यांचा ब्लाउज, साधी सहावारी साडी… एवढ्याच साध्या वेशातही स्त्री किती विलक्षण सुंदर दिसू शकते, याचे हे उत्तम उदाहरण(Nostalgic Songs) आहे.
गीत, संगीत, गायन, अभिनय, छायांकन… सगळ्याच गोष्टींची भट्टी इतकी सुंदर जमून आली आहे की, पन्नास वर्षांनंतरही हे गाणे तितकेच ताजे, तितकेच मधुर आणि तितकेच हृदयस्पर्शी(Nostalgic Songs) वाटते.
कदाचित म्हणूनच काही गाणी आपण ऐकत नाही… ती आपण जगत असतो.
भेटत राहू याच सदराच्या माध्यमातून अशाच अनेक अवीट (Nostalgic Songs) गीतासोबत
धन्यवाद
विवेक कुलकर्णी
सोबत गाण्याचे बोल आणि गीताची लिंक देत आहे
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
लपसि कोठे लपसि कोठे गोपाला गोविंदा
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
तुझे निळेपण आभाळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
तुझे निळेपण आभाळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
प्रसन्न सुंदर वा कमळाचे
प्रसन्न सुंदर वा कमळाचे
त्याची मज हो बाधा
त्याची मज हो बाधा
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
तुला शोधिते मी दिनराती
तुजसि बोलते हरि एकांती
तुला शोधिते मी दिनराती
तुजसि बोलते हरि एकांती
फिरते मानस तुझ्या सभोवति
फिरते मानस तुझ्या सभोवति
छंद नसे हा साधा
छंद नसे हा साधा
प्रेमवेडी राधा साद घाली मुकुंदा
क्रमशः…
