(पिंपरी-चिंचवड (दि. ९) : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने धडक कारवाई करत मकोकासह पाच गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या सराईत इराणी चैन चोराला त्याच्या साथीदारासह अटक केली. फिदा हुसैन मानुआली इराणी (वय ३३) आणि मुकेश अरुण नेटके (वय ३८, दोघे रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत चैन चोरीचे १५ गुन्हे उघडकीस आले असून, ३५ लाख ३३ हजार रुपये किमतीचे २७ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले (Pcmc Chain Theft) आहेत.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चैन चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ४०० ते ५०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलिसांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी देहूरोड परिसरातून दोघांना अटक (Pcmc Chain Theft)केली.
चौकशीत फिदा इराणी याने साथीदार आदित्य मनलोर आणि कासीम जाफर हुसेन यांच्या मदतीने पिंपरी-चिंचवड परिसरात १३, तर पुणे शहरात दोन चैन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या १५ गुन्ह्यांतील चोरीचा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला (Pcmc Chain Theft)आहे.
भोसरी एमआयडीसी, तळेगाव दाभाडे, देहूरोड, निगडी, रावेत, हिंजवडी, वाकड तसेच पुण्यातील खराडी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांचा यात समावेश(Pcmc Chain Theft) आहे.
फिदा इराणी याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि चैन चोरीसह गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत. रावेत पोलीस ठाण्यात त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, तो पाच गुन्ह्यांत हवा होता. मुकेश नेटके याच्यावर अमली पदार्थ बाळगल्याचा गुन्हा दाखल (Pcmc Chain Theft)आहे.
दरम्यान, चैन चोरी व बतावणी करणाऱ्या तालीब बाबा इराणी (वय २१) आणि अली अब्बास शौकत इराणी (वय २८) यांनाही ८ सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले (Pcmc Chain Theft)आहे.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सन २०२६ मध्ये आतापर्यंत ३२ चैन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून ५० लाख ६३ हजार रुपये किमतीचे ४१ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले(Pcmc Chain Theft) आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात (Pcmc Chain Theft)आली.
