पिंपरी, दि. १३ मे २०२६ : पंढरीच्या वारीचे अध्यात्म, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास उलगडणारे ‘अंतर्नाद’ हे भव्य संगीत नाटक शनिवारी (दि.१६ मे) सायंकाळी ७ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रथमच रंगमंचावर सादर होणार (Antarnad Marathi Play) आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा मोरया थिएटर्सचे संस्थापक आणि नाटकाचे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रणव सपकाळे, मनोज डाळिंबकर, निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे, राजू बंग आदी उपस्थित (Antarnad Marathi Play)होते.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, “पंढरीची वारी हा जगातील अद्वितीय आध्यात्मिक सोहळा असून, सर्व जातीधर्मातील वारकरी एकत्र येऊन विठ्ठल भक्तीत सहभागी होतात. ‘अंतर्नाद’ या नाटकातून प्रेक्षकांना अडीच तासांत वारीचा आत्मिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला (Antarnad Marathi Play)आहे.”
या नाटकात तब्बल ५१ कलाकारांचा सहभाग असून अभंग, गवळण, भारूड, पोवाडा यांसारख्या लोककलेच्या विविध प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. भक्ती, संगीत आणि लोकसंस्कृतीचा सुंदर संगम या नाटकातून अनुभवायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, लोकसंगीतात वापरली जाणारी अनेक पारंपरिक वाद्येही या प्रयोगात वापरण्यात आली (Antarnad Marathi Play)आहेत.
नाटकाचे दिग्दर्शक मनोज डाळिंबकर यांनी सांगितले की, “वारीचे महत्व आणि वारकरी परंपरेतील अध्यात्मिक मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘अंतर्नाद’मधून करण्यात आला आहे. संत साहित्यावर आधारित असले तरी या नाटकाची संकल्पना, कथा आणि सादरीकरण पूर्णपणे नवीन (Antarnad Marathi Play)आहे.”
‘अंतर्नाद’ हे केवळ संगीत नाटक नसून, आत्म्याशी संवाद साधणारा एक भावनिक प्रवास आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या एका युवा वारकऱ्याच्या अंतर्मनातील बदल आणि विठ्ठल भक्तीचा प्रवास यात उलगडण्यात आला (Antarnad Marathi Play)आहे.
या नाटकाचे लेखन विनोद रत्ना यांनी केले असून, संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळिंबकर यांचे आहे. संगीत निरंजन पेडगावकर यांनी दिले असून गीतलेखन मुराद तांबोळी यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शन अंकिता शिवतरे आणि सौगंध कापसे यांनी केले आहे. प्रकाशयोजना अभिप्राय कामठे, रंगभूषा कमलेश बिचे, वेशभूषा वेदिका काळे यांनी सांभाळली असून सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी केले (Antarnad Marathi Play) आहे.
या नाटकाचा दुसरा प्रयोग शुक्रवार, दि. २२ मे रोजी हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता होणार आहे. नाटकाची तिकिटे ‘बुक माय शो’, ‘तिकीट खिडकी’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तसेच नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवर उपलब्ध (Antarnad Marathi Play)आहेत.
अधिक माहिती व तिकीट आरक्षणासाठी संपर्क :
पंकज चव्हाण – ८१४९२७८४९२
राजेंद्र बंग – ९८२२३१३०६६
