निगडी, दि. १२ एप्रिल २०२६ :“कोणत्याही कलावंताकडे असणारा जाणता अस्वस्थपणाच त्याला प्रगतीपथावर नेतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार व गीतकार रमण रणदिवे यांनी (Ghazalpushpa Award) केले .
गझलपुष्प संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणारा स्व. सुदामदादा नामदेव कराळे स्मरणार्थ गझलपुष्प जीवन गौरव पुरस्कार यंदा रमण रणदिवे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर , प्रमुख पाहुणे सुनील कराळे व त्यांच्या कुटुंबीय, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे , संस्था अध्यक्ष संदीप जाधव तसेच ज्येष्ठ सल्लागार नंदकुमार मुर्डे यांच्या हस्ते प्रदान करण्यात (Ghazalpushpa Award) आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्तर देताना रणदिवे यांनी गझलपुष्प संस्थेचे कौतुक केले. मराठी गझल क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणारी व गझलच्या प्रचार-प्रसारासाठी झटणारी ही संस्था असल्याचे त्यांनी नमूद(Ghazalpushpa Award) केले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा उद्योगनगरीपासून सांस्कृतिक नगरीकडे झालेला प्रवास उलगडत गझलप्रती आपला आदर व प्रेम व्यक्त(Ghazalpushpa Award) केले.
या
नंतर ‘गझलसंध्या’ या कार्यक्रमात संगीतकार व गायक कुमार करंदीकर यांनी मराठी गझलांचा सुरेल नजराणा सादर केला. यामध्ये गझल सम्राट सुरेश भट यांच्यासह रमण रणदिवे, निलेश शेंबेकर, संदीप जाधव, प्रशांत पोरे, दिनेश भोसले, अभिजीत काळे, मीना शिंदे, सरोज चौधरी, प्रदीप तळेकर, गणेश भुते आणि अविनाश घोंगटे यांच्या गझलांचा समावेश (Ghazalpushpa Award)होता.
या सादरीकरणाला तबला वादक विनीत तिकोणकर तसेच हार्मोनियम वादक मंदार गोडसे यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सुरेख व बहारदार निवेदन संस्थापक सचिव दिनेश भोसले यांनी(Ghazalpushpa Award) केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जाधव यांनी केले, तर अभिजीत काळे लिखित मानपत्राचे वाचन नंदकुमार मुरडे यांनी केले. या सोहळ्यास प्रविण पोकर्णा, सविता इंगळे, सुबोध गलांडे, अशोक भांबुरे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित (Ghazalpushpa Award)होते.
कार्यक्रमाचे नियोजन भूषण अहिर, आदेश कोळेकर आणि सारिका माकोडे यांनी यशस्वीरीत्या(Ghazalpushpa Award) केले.
