पिंपरी, दि. २० जुलै : वाल्हेकरवाडी येथील दगडोबा चौक परिसरातील एका निवासी इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना सोमवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत तीन इलेक्ट्रिक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या, तर आगीने शेजारील दोन मजली इमारतीलाही वेढा (EV Charging Fire)दिला.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तीन बंबांसह घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या दोन महिलांची जवानांनी सुरक्षित सुटका केली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली(EV Charging Fire) नाही.
उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचाव व अग्निशमन कार्य करत आग परिसरात पसरू दिली(EV Charging Fire) नाही.
या घटनेनंतर अग्निशमन विभागाने नागरिकांना निवासी इमारतींमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करताना आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने १०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात (EV Charging Fire) आले.
