पिंपरी (प्रतिनिधी) : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, त्याची झळ भारतासारख्या विकसनशील देशांनाही बसत आहे. कच्च्या तेलाचे वाढते दर, अमेरिकन डॉलरची मजबुती, रुपयाचे अवमूल्यन आणि वाढता आयात खर्च यामुळे देशात महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने-चांदी खरेदी, पेट्रोल-डिझेल वापर आणि खाद्यतेलाच्या वापरात संयम बाळगण्याचे केलेले आवाहन हे केवळ आर्थिक नसून राष्ट्रीय जबाबदारीचे प्रतीक असल्याचे मत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंत भोसले यांनी व्यक्त (Inflation Crisis) केले.
पिंपरी येथे बुधवारी (दि. १३) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भोसले म्हणाले की, भारत मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल, खाद्यतेल आणि सोन्याच्या आयातीवर अवलंबून आहे. युद्धजन्य परिस्थितीत डॉलर मजबूत झाल्यास रुपयाची किंमत घसरते आणि आयात खर्च वाढतो. परिणामी पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात, वाहतूक खर्च वाढतो, शेती उत्पादनाचा खर्च वाढतो आणि महागाईचा थेट भार सामान्य नागरिकांवर (Inflation Crisis)पडतो.
“याचा सर्वाधिक फटका मजूर वर्ग, शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबे, लघुउद्योग आणि छोट्या व्यावसायिकांना बसतो. डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टर, पंप आणि शेती मशागतीचा खर्च वाढतो. मालवाहतूक महाग झाल्याने भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात,” असेही त्यांनी (Inflation Crisis) सांगितले.
पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर, अनावश्यक खरेदी टाळणे, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणे आणि देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी सहकार्य करणे ही आजची गरज असल्याचे भोसले यांनी नमूद केले. “देश आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिला तरच मजूर, शेतकरी आणि सामान्य नागरिक सुरक्षित राहतील. त्यामुळे ही केवळ सरकारची लढाई नसून प्रत्येक भारतीयाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे ते (Inflation Crisis) म्हणाले.
यासोबतच केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करणे, आवश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण ठेवणे, कामगार व शेतकऱ्यांसाठी आर्थिक संरक्षणाच्या योजना मजबूत करणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी (Inflation Crisis) सांगितले.
“भारत सध्या आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक टप्प्यावर उभा आहे. संयम, राष्ट्रीय एकात्मता आणि आर्थिक शिस्त यांच्या माध्यमातून आपण देशाला अधिक सक्षम बनवू शकतो,” असा विश्वासही यशवंत भोसले यांनी व्यक्त(Inflation Crisis) केला.
