(पिंपरी, दि. ३१ ऑगस्ट २०२६ ): पिंपरी-चिंचवड महापालिकेची २ सप्टेंबर २०२६ रोजी होणारी विशेष सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा दावा नगरसेवक तथा माजी महापौर योगेश बहल यांनी केला आहे. या संदर्भात त्यांच्या वतीने ॲड. असीम सरोदे अँड असोसिएट्स एलएलपीमार्फत महापालिका महापौर, आयुक्त आणि नगरसचिव यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली (Pcmc General Body Meeting)आहे.
२० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजेंड्यावरील सर्व विषयांवर चर्चा न होता सभा १७ सप्टेंबर २०२६ पर्यंत तहकूब करण्यात आली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार तहकूब झालेली सभा ही मूळ सभेचेच सातत्य मानली जाते आणि प्रलंबित विषय त्याच तहकूब सभेत घेणे अपेक्षित असल्याचे बहल यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये नमूद करण्यात आले (Pcmc General Body Meeting)आहे.
मात्र, २० ऑगस्टच्या तहकूब सभेतील काही विषय २ सप्टेंबर रोजी आयोजित विशेष सभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आल्याचा आक्षेप बहल यांनी घेतला आहे. आधीच्या तहकूब सभेतील विषय निवडक पद्धतीने दुसऱ्या सभेत घेणे हे संबंधित कायदेशीर तरतुदींशी विसंगत असल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला (Pcmc General Body Meeting)आहे.
एकाच विषयाला दोन वेगवेगळ्या सभांच्या कायदेशीर कक्षेत ठेवता येणार नाही, अशी भूमिका बहल यांनी घेतली आहे. २० ऑगस्टच्या सभेतील विषय २ सप्टेंबरच्या विशेष सभेत घेऊन त्यावर निर्णय झाल्यास मूळ तहकूब सभेच्या अधिकाराला बाधा निर्माण होऊ शकते, असा आक्षेपही त्यांनी नोंदविला(Pcmc General Body Meeting) आहे.
२ सप्टेंबरच्या विशेष सभेच्या विषयपत्रिकेत २० ऑगस्टच्या तहकूब सभेतील समान किंवा ओव्हरलॅपिंग विषय असल्यास ते तातडीने वगळावेत आणि संबंधित विषय केवळ १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तहकूब सभेतच नियमानुसार चर्चेसाठी ठेवावेत, अशी मागणी कायदेशीर नोटीसमधून करण्यात आली (Pcmc General Body Meeting)आहे.
दरम्यान, या मागणीवर प्रशासनाकडून योग्य कार्यवाही न झाल्यास संबंधित कार्यवाहीविरोधात सक्षम न्यायालयात कायदेशीर दाद मागण्यात येईल, असा इशाराही बहल यांच्या वतीने देण्यात आला (Pcmc General Body Meeting)आहे.
