प्रतिनिधी :केंद्र सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क थेट ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवले असून, हा वाढीव दर आजपासून लागू करण्यात आला (Import Duty Hike) आहे.
या निर्णयामुळे देशातील सराफा बाजारावर तात्काळ परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, ग्राहकांवर त्याचा थेट आर्थिक परिणाम होऊ (Import Duty Hike)शकतो.
केंद्र सरकारने वाढत्या आयातीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि देशातील व्यापार तूट कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. वाढीव १५ टक्के शुल्कापैकी ५ टक्के हिस्सा कृषी आणि विकासकामांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारला महसूलवाढीसोबतच विकास प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार(Import Duty Hike) आहे.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश मानला जातो. देशांतर्गत सोन्याचे उत्पादन मर्यादित असल्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते. परिणामी, मोठ्या प्रमाणावर डॉलर खर्च होत असल्याने परकीय चलनावर ताण निर्माण (Import Duty Hike) होतो.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, आयात शुल्क वाढवल्याने सोन्याची मागणी काही प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे व्यापार तूट नियंत्रणात ठेवण्यास मदत होण्याबरोबरच रुपयावरील दबावही कमी होण्याची शक्यता (Import Duty Hike) आहे.
दरम्यान, या निर्णयानंतर आगामी काळात सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष आता सराफा बाजारातील बदलांकडे लागले (Import Duty Hike) आहे.
