प्रतिनिधी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाचा आधार घेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी गुरुवारी (दि. १५) पिंपरी-चिंचवड महापालिकेत बैलगाडीतून प्रवेश करत सत्ताधारी भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली. महापालिकेतील वाढत्या खर्चाविरोधात आणि पदाधिकाऱ्यांच्या सुविधांवरील कथित उधळपट्टीच्या निषेधार्थ हे अनोखे आंदोलन करण्यात (PCMC protest NCP) आले.
सर्वसाधारण सभेसाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती माई काटे, प्रतीक्षा जवळकर आणि नगरसेवक राजू बनसोडे हे बैलगाडीतून महापालिका भवनात दाखल झाले. पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि बैलगाडीमुळे महापालिका परिसरात नागरिक आणि कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष वेधले (PCMC protest NCP) गेले.
यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकप्रतिनिधींना काटकसरीचे आवाहन करत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत मात्र त्याच्या नेमकं उलट चित्र दिसत आहे. आर्थिक अडचणींचा दावा केला जातो, पण दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपयांचा खर्च, परदेश दौरे आणि अनावश्यक खर्च सुरूच (PCMC protest NCP)आहेत.”
महापालिकेतील काही अलीकडील निर्णयांचा उल्लेख करत राष्ट्रवादीने भाजपच्या कारभारावर ‘दिखाऊ विकास’ आणि ‘प्रसिद्धीचा हव्यास’ असल्याची टीका केली. सामान्य नागरिकांना पाणी, रस्ते, वाहतूक आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असताना सत्ताधारी मात्र जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोपही करण्यात (PCMC protest NCP)आला.
बैलगाडीच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती, साधेपणा आणि इंधन बचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. “हे आंदोलन प्रसिद्धीसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेविरोधातील निषेध आहे,” असेही त्यांनी स्पष्ट(PCMC protest NCP) केले.
या आंदोलनामुळे महापालिकेतील खर्च, पदाधिकाऱ्यांच्या सुविधा आणि आर्थिक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत (PCMC protest NCP)आहेत.
