(पिंपरी, दि. २१ ऑगस्ट २०२६) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील कला, साहित्य व सांस्कृतिक चळवळीला व्यापक व्यासपीठ देण्यासाठी ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात १८ ते २० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसीय महोत्सव होणार असल्याची माहिती महापौर रवि लांडगे यांनी (Pcmc Festival 2026) दिली.
महोत्सवात व्यावसायिक मराठी नाटकांचे प्रयोग, भावगीत-नाट्यगीत व भक्तिगीतांची संगीत मैफल, लावणी, रॉक बँड, राज्यस्तरीय कवी संमेलन तसेच लाठी-काठी, दांडपट्टा आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. महिलांसाठी पाककला स्पर्धा व फॅशन शो, बालनाट्य आणि बाल एकांकिका स्पर्धा तसेच पारंपरिक वस्तू, हस्तकला, स्थानिक कलाकुसर आणि खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणारी ‘संस्कृती जत्रा’ही आयोजित केली जाणार(Pcmc Festival 2026) आहे.
शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या गुणवंतांचा ‘कलारत्न’, ‘साहित्यरत्न’, ‘क्रीडारत्न’, ‘नृत्यरत्न’ आणि ‘संगीतरत्न’ पुरस्कारांनी विशेष गौरव करण्यात येणार(Pcmc Festival 2026) आहे.
शहराची औद्योगिक ओळख कायम ठेवतानाच कला, साहित्य, नाट्य, संगीत आणि लोकसंस्कृतीची सांस्कृतिक नगरी म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख अधिक दृढ करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त (Pcmc Festival 2026)केला.
महोत्सवात नागरिक, कलाप्रेमी, महिला, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले (Pcmc Festival 2026) आहे.
महोत्सवाचा कालावधी : १८ ते २० सप्टेंबर २०२६
स्थळ : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
आयोजक : पिंपरी-चिंचवड महोत्सव (Pcmc Festival 2026)समिती
स्पर्धा नावनोंदणी व माहितीसाठी : मनोज डाळीम्बकर – ८२३७३३२२११, राजेंद्र बंग – ९८२२३१३०६६
