(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरातील मूलभूत सुविधा अधिक दर्जेदार करण्यासह विविध विकासकामांच्या प्रस्तावांना सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात (PCMC Standing Committee)आली.
सभेच्या सुरुवातीला शहर अभियंतापदी नियुक्ती झाल्याबद्दल मनोज सेठीया यांचा सत्कार करण्यात(PCMC Standing Committee) आला.
मोरवाडी व कासारवाडी येथे विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचे जपानी व जर्मन भाषा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. भाषा परीक्षेचे मार्गदर्शन, प्रमाणपत्र तसेच भारत आणि परदेशातील रोजगारासाठी प्लेसमेंट सपोर्टही उपलब्ध करून दिला जाणार (PCMC Standing Committee)आहे.
निगडी सेक्टर २३ व चिखली जलशुद्धीकरण केंद्रांसाठी रसायने व ब्लिचिंग पावडर खरेदी, विविध भागांतील पाणी वितरण व्यवस्था आणि पाण्याच्या टाक्यांच्या सफाईच्या कामांना मंजुरी देण्यात आली. नाशिक फाटा-वाकड, पुणे-आळंदी बीआरटीएस कॉरिडॉर तसेच भक्ती-शक्ती चौक ते गोडाऊन चौक रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणालाही मान्यता (PCMC Standing Committee)मिळाली.
वायसीएम व नवीन थेरगाव रुग्णालयातील एमआरआय तपासण्यांच्या बिलांची अदायगी, जैववैद्यकीय कचऱ्यासाठी आवश्यक साहित्य तसेच आरोग्य कार्यक्रमांसाठी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यास मंजुरी देण्यात आली. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवरील १६व्या ज्युनिअर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या पायाभूत सुविधांसह ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या खर्चालाही मान्यता देण्यात(PCMC Standing Committee) आली.
नागरिकहित, गुणवत्तापूर्ण सुविधा आणि कार्यक्षम प्रशासन केंद्रस्थानी ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थायी समिती कटिबद्ध असल्याचे सभापती अभिषेक बारणे यांनी (PCMC Standing Committee)सांगितले.
