पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:प्रखर राष्ट्रभक्ती, हिंदुत्वनिष्ठ विचार आणि राष्ट्रनिर्माणासाठी अविरत कार्य करणाऱ्या व्यक्तींना ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’ भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांना प्रदान करण्यात (Savarkar Award) आला.
पुरस्कार स्वीकारताना आमदार महेश लांडगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांप्रती आपली निष्ठा व्यक्त करत “स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असलेले ‘विकासाभिमुख हिंदुत्व’ जपण्याचा आम्ही संकल्प केला आहे,” असे प्रतिपादन (Savarkar Award)केले.
“ज्या महापुरुषांच्या विचारांनी देशाला दिशा दिली, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी सन्मान आहे,” असेही त्यांनी (Savarkar Award) सांगितले.
ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते आमदार महेश लांडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष राजन लोणकर, संस्थापक अंकित काणे, रोहन जोशी, संघटनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित (Savarkar Award) होते.
कार्यक्रमात बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करताना देव, देश आणि धर्मरक्षणासोबतच विकासात्मक दृष्टिकोन ठेवून समाजहितासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. विकास आणि हिंदुत्व यांचा समन्वय साधत समाजकारण व राष्ट्रकारण करण्याची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांतून (Savarkar Award) मिळते.
“स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने पुरस्कार मिळावा, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला हा बहुमान मिळणे हे माझे भाग्य आहे,” असे सांगत त्यांनी ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार (Savarkar Award) मानले.
भाषणाच्या सुरुवातीला आमदार महेश लांडगे यांनी महान क्रांतिकारक आणि प्रखर राष्ट्रभक्त विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. देव, देश आणि धर्मासाठी संस्कृतीचे रक्षण व संवर्धन करण्याचे कार्य त्यांनी अखंडपणे केले. त्यांच्या विचारांमुळे स्वातंत्र्य चळवळीला नवे बळ मिळाले आणि अखंड भारताची संकल्पना जनमानसात रुजली, असे त्यांनी नमूद (Savarkar Award) केले.
प्रतिक्रिया :
“स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार स्वीकारताना ‘विकासाभिमुख हिंदुत्व’ जपण्याची जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीव झाली. देव, देश, धर्म आणि संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प आम्ही पुन्हा केला आहे. भविष्यातही विकास आणि हिंदुत्व यांचा समन्वय साधत जनतेसाठी कार्यरत (Savarkar Award) राहू.”
— महेश लांडगे,
आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, (Savarkar Award) पुणे.
