पिंपरी : फुगेवाडी येथील विषारी दारू प्रकरणातील बाधित रुग्णांवर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार सुरू असून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी रुग्णालयाला भेट देत रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना दिलासा (Fugewadi Liquor Tragedy)दिला.
यावेळी आयुक्तांनी उपचार व्यवस्थेचा आढावा घेत रुग्णांवर कोणतीही कमतरता न ठेवता सर्व आवश्यक उपचार मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून रुग्णांना तातडीने उपचार मिळतील याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी (Fugewadi Liquor Tragedy)केल्या.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह आरोग्य( Fugewadi poisonous liquor case) वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, तसेच वायसीएम रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित (Fugewadi Liquor Tragedy)होते.
यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयातील उपचार व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. परिस्थिती लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने सतर्क राहून या प्रकरणातील आलेल्या रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर तात्काळ आवश्यक सर्व उपचार करण्याच्या सूचना त्यांनी (Fugewadi Liquor Tragedy)दिल्या.
दाखल रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या रुग्णांच्या प्रकृती विषयी माहिती दिली. महापालिकेच्या वतीने उत्तम वैद्यकीय उपचार रुग्णांवर केले जात आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत सातत्याने या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात असून या रुग्णांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार येण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सातत्याने कार्यान्वित ठेवण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी नातेवाईकांना दिली. काळजी करू नका, महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असा धीर देखील रुग्णांच्या नातवाईकांना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी (Fugewadi Liquor Tragedy)दिला.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले की, वायसीएम रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर आणि औषधसाठा उपलब्ध असून सध्या तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बाधित नागरिकांनी विलंब न करता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी(Fugewadi Liquor Tragedy) केले.
