(पिंपरी, प्रतिनिधी ): बदलत्या काळात नोकरीच्या संधी कमी होत असल्या तरी तरुणांनी हताश न होता उपलब्ध संधींचा उपयोग करून घ्यावा. एआयच्या युगातही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून, तरुणांना करिअर आणि शिक्षणाबाबत योग्य मार्गदर्शन देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी (Shiv Sena Job Fair)सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने चिंचवडगावातील चिंचवडे लॉन्स येथे रविवारी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन सचिन अहिर यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर रवी लांडगे, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, गटनेते विश्वजीत बारणे, शहरप्रमुख निलेश तरस यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित(Shiv Sena Job Fair) होते.
तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळावे, हा मेळाव्याचा उद्देश आहे. नोकरी न मिळालेल्या उमेदवारांना जॉबकार्ड देऊन पुढील संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उद्योग टिकला तर कामगार आणि कामगार टिकला तर संघटना टिकतील. त्यामुळे उद्योगांना प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे, असे अहिर (Shiv Sena Job Fair)म्हणाले.
किमान सहा महिन्यांतून एकदा रोजगार मेळावा आयोजित करून तरुणांना मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. शहर, जिल्हा आणि प्रभाग पातळीवरही अशा उपक्रमांची गरज आहे. तरुणांना घराजवळ रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असेही अहिर यांनी (Shiv Sena Job Fair)सांगितले.
यावेळी महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते एका दिव्यांग उमेदवाराला ऑफर लेटर देण्यात आले. विश्वजीत बारणे यांनी प्रास्ताविक केले, तर सुलभा उबाळे यांनी मनोगत व्यक्त (Shiv Sena Job Fair)केले.
श्रीरंग बारणे यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळावी
खासदार श्रीरंग बारणे यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळायला हवी. दिल्लीतील राजकारणात त्यांचे वजन असून त्यांनी आपली विश्वासार्हता निर्माण केली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कार्याची पूर्ण माहिती आहे, असे सचिन अहिर यांनी नमूद (Shiv Sena Job Fair)केले.
तरुणांना रोजगारासाठी व्यासपीठ
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध घटकांसाठी योजना राबविल्या जात आहेत. तरुणांना सहजपणे नोकरी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून, दोन हजारांहून अधिक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी (Shiv Sena Job Fair)सांगितले.
