प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोयता गँगच्या वाढत्या दहशतीनंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव समोर आल्याने शहरातील नागरिक आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रावेत परिसरातील प्रसिद्ध ‘एजे फर्निचर मॉल’वर दोन अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ (Lawrence Bishnoi Gang) उडाली.
ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी मॉलसमोर थांबत अचानक गोळीबार सुरू केला. आरोपींकडे दोन पिस्तुलं होती आणि त्यांनी मॉलच्या दिशेने पाच ते सहा राऊंड फायरिंग केल्याचे सांगितले जात आहे. या गोळ्या मॉलच्या नेमप्लेट आणि काचेवर आदळल्याने नुकसान झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले, तर आरोपी काही क्षणांत घटनास्थळावरून पसार (Lawrence Bishnoi Gang)झाले.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपासाला वेग दिला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथकेही तयार करण्यात आली(Lawrence Bishnoi Gang) आहेत.
या प्रकरणाला आणखी गंभीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा समोर आला. संबंधित पोस्टमध्ये एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, “हा फक्त ट्रेलर आहे, पुढची गोळी थेट डोक्यात असेल,” असा धमकीवजा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे व्यावसायिकांना लक्ष्य करून टोळ्यांकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून या सोशल मीडिया पोस्टची सत्यता तपासली जात(Lawrence Bishnoi Gang) आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये स्वतःला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ ‘आरजू बिश्नोई’ असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचे बोलले जात आहे. “जो आमच्या विरोधात जाईल, त्याची आमच्यासोबत लवकरच भेट होईल,” असा धमकीचा सूर या ऑडिओमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा ऑडिओ खरोखरच बिश्नोई गँगशी संबंधित आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली(Lawrence Bishnoi Gang) नाही.
या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा वाढता प्रभाव आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण असून, शहरातील सुरक्षाव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात (Lawrence Bishnoi Gang) आहे.
पोलिस उपायुक्त गणेश इंगवले यांनी सांगितले की, घटनास्थळावरून महत्त्वाचे फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला(Lawrence Bishnoi Gang) आहे.
