पिंपरी-चिंचवड : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोशी येथील कचरा डेपोमध्ये बुधवारी मोठी दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन महानगरपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळल्याची माहिती मिळत (Moshi Garbage Depot) आहे.
या दुर्घटनेत दोन ते तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, आठ ते दहा कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला (Moshi Garbage Depot)नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच इतर संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके अथक प्रयत्न करत (Moshi Garbage Depot)आहेत.
दरम्यान, मृत आणि जखमींची नेमकी संख्या तसेच दुर्घटनेचे कारण याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता (Moshi Garbage Depot)आहे.
